Wednesday 2 January 2013


तुज आठवते का ?. . . .



हातात हात गुंफुन करुन साखळी 
धुंदीत भटकणे वाट सदा मोकळी !
कधी स्तब्धच नूसते पाहात बसने जळी
तुज आठवते का ?. . . .

क्सलेसे घेऊनी पान एकदा करी
फिरिवलेस माज्या हळुच पापणीवरी 
थरथरत शहारत गेले काही उरी 
तुज आठवते का ? . . .

कधी कातरवेळी घट्ट बिलगुनी 
दुरात कुठे तरी खिळवूनीया पापणी 
भारवूनी झाले शब्द मूक ज्या क्षणी 
तुज आठवते का ?. . . .

हळुहळु तरुंच्या गूढ़सरल सावल्या 
पंखापरी पसरत संथ गहन जाहल्या 
दोघांच्या छाया. . .एकरुप आपु्ल्या !  
तुज आठवते का ?. . . .
                     _ मंगेश पाडगावकर


No comments: